IND vs ENG Test | टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध विजय नक्की, निर्णायक सामन्यातून स्टार बॉलर बाहेर
टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या (IND vs ENG Test) कसोटी मालिकेतील शेवटच्या (IND vs ENG 5th Test) सामन्यात भिडणार आहे.
मुंबई : टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या (IND vs ENG Test) कसोटी मालिकेतील शेवटच्या (IND vs ENG 5th Test) सामन्यात भिडणार आहे. हा पाचवा आणि शेवटचा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 4 सामन्यांनंतर 2-1 ने आघाडीवर आहे. (ind vs eng test series england faster bowler jofra archer ruled out last test match against team india)
टीम इंडियाला ही सीरिज जिंकण्याची संधी आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज या सामन्यातून बाहेर पडला आहे.
जोफ्रा आर्चर मालिकेतून बाहेर
इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा कंबरेतील फ्रॅक्चरमुळे बाहेर गेला आहे. यामुळे आर्चरला टीम इंडिया विरुद्धच्या टेस्ट मॅचला मुकावं लागणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी याबाबत माहिती दिली.
टीम इंडिया गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यावर होती. या दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेतील 4 सामन्यांचं आयोजन हे यशस्वीरित्या करण्यात आलं. मात्र यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पाचवा सामना स्थगित करण्यात आला होता.