IND VS END : विराट कोहली रचणार नवा रेकॉर्ड, फक्त 72 रन दूर
टी-20 सीरीजमध्ये 72 धावा करताच विराट कोहली इतिहास रचणार आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सीरीज 12 मार्चपासून पार पडणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे नवे रिकॉर्ड करण्याची संधी आहे. टी-20 सीरीजमध्ये 72 धावा करताच विराट कोहली इतिहास रचणार आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली टी-20 मध्ये 72 रन करताच जगात टी-20 इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे. जगातील कोणत्याच फलंदाजाने आता पर्यंत टी-20 सीरीज इंटरनेशनलमध्ये हा विक्रम नोंदवलेला नाही. विराट कोहली सर्वात वेगवान धावा करणारा फलंदाज आहे. याशिवाय कोहलीने आता पर्यंत टी-20 इंटरनेशनल सीरीजमध्ये 2928 धावा केल्या आहेत. विराटने टी-20 इंटरनेशनलमध्ये 50 च्या स्ट्राईकरेटने 25 अर्धशतक केले आहेत.
विशेष म्हणजे टी-20 इंटरनेशनलमध्ये वेगवान धावा करणाऱ्या विराट कोहली नंतर न्यूझीलंड संघाचा ओपनर मार्टीन गप्टीलचा नंबर येतो. त्यानंतर भारतीय संघाचा हिटमॅन रोहीत शर्माचा क्रमांक लागतो. टी-20 इंटरनॅशनलमध्ये मार्टीन गप्टीलने 2839 धावा केल्या आहेत. तर रोहीत शर्माने 2773 धावा केल्या आहेत.
टी-20 मध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
विराट कोहली (भारत) - 2928
मार्टीन गुप्टील (न्यूझीलंड) - 2839
रोहीत शर्मा (भारत) - 2773
एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - 2346
शोएब मलिक (पाकिस्तान) - 2335