IND vs IRE 1st T20:  भारत आणि आयर्लंड यांच्या खेळलेल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्याच टीम इंडियाने यजमान आयर्लंडचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 139 धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 2 धावांनी विजय मिळवला आहे. जसप्रीत बुमराहच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाचा हा पहिला विजय होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी20 सामना डब्लिन येथे 18 ऑगस्ट रोजी खेळला गेला. आयर्लंडकडून विजयासाठी मिळालेल्या 140 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केल्या होत्या, त्यावेळी पावसाचे जोरदार हजेरी लावली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने 24 धावा तर ऋतुराज गायकवाड याने 19 धावा केल्या. तिलक वर्मा गोल्डन डकवर बाद झाला. तर संजू सॅमसन 1 धाव करत नॉट आऊट राहिला. पाऊस आला त्यावेळी ऋतुराज आणि संजू मैदानात होते. क्रेग यंग याने भारताचे दोन गडी बाद केले.


प्रथम गोलंदाजी करताना, तब्बल 11 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बुमराहने आज भेदक गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने दोन विकेट काढल्या. तर रवी बिश्नोई आणि डेब्यू मॅन प्रसिद्ध कृष्णा याने देखील घातक मारा करत 2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह याच्या नावावर 1 विकेट राहिली. 20 ओव्हरमध्ये आयर्लंडने 7 गड्यांच्या बदल्यात 139 धावा केल्या. 



पाहा प्लेईंग XI


आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.


भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (WK), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.