मुंबई : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका (IND vs IRE T 20I Series) खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे. तर टीम इंडियाला नवा कॅप्टनही मिळाला आहे. आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (ind vs ire t20i series hardik pandya become 9th t20i indian captain who will lead team)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासह हार्दिक टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील नववा कर्णधार ठरला आहे.  याआधी 8 जणांनी टीम इंडियाचं टी 20 मध्ये नेतृत्व केलं आहे. 


टीम इंडियाचे टी 20 कॅप्टन्स


वीरेंद्र सेहवाग टीम इंडियाचा पहिला T20 कॅप्टन होता. सेहवागने 2006 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं. सेहवागने केवळ 1 सामन्यातचं भारताचं नेतृत्व केलं. यानंतर एमएस धोनीने 72, सुरेश रैना 3, अजिंक्य रहाणे 2, विराट कोहली 50, रोहित शर्मा 28, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबादारी सांभाळली आहे.


हार्दिकला आयपीएलच्या 15 व्या मोसमात नेतृत्वाची संधी मिळाली. त्याने त्या संधीचं पूर्णपणे सोनं केलं. बॉलिंग, बॅटिंग आणि कॅप्टन्सी अशा तिन्ही आघाड्यांवर त्याने यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. इतकंच नाही, तर पहिल्याच मोसमात आपल्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे आता हार्दिक आयर्लंड विरुद्ध कशाप्रकारे नेतृत्व करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.   


कोणाला किती नेतृत्वाचा अनुभव


वीरेंद्र सेहवाग : 1 मॅच 
एमएस धोनी : 72 मॅच
सुरेश रैना :  3 मॅच
अजिंक्य रहाणे : 2 मॅच 
विराट कोहली : 50 मॅच
रोहित शर्मा : 28 मॅच
शिखर धवन : 3 मॅच
ऋषभ पंत :  3 मॅच
हार्दिक पंड्या : 0*


आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.  


आयर्लंड टीम :


एंड्रयू बलबर्नी (कॅप्टन), मार्क अडायर, कर्टिस कँपर, गैरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटिल, एंड्रयू मॅकब्राइन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ओल्फर्ट, पॉल स्टलिर्ंग, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर आणि क्रेग यंग.