India vs New Zealand 1st ODI: टीम इंडिया (Team India) उद्या 25 नोव्हेंबरपासून न्युझीलंडसोबत (New Zealand) 3 सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेवर टी20 मालिकेप्रमाणे पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टी20 मालिकेप्रमाणे आता वनडेतही क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचा हिरमोड होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार? 


पावसाची शक्यता


न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team India) आता 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. पहिला सामना उद्या (25 नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टी-20 मालिकेप्रमाणेच पहिला वनडे सामना देखील पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.  ( IND vs NZ Weather Report )


हे ही वाचा : Suryakumar Yadav चा विदेशात देसी तडका, PHOTO आले समोर


हवामानाचा अंदाज काय? 


 AccuWeather नुसार, शुक्रवारी सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी गुरुवार आणि शुक्रवारी रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस थांबला तरी सामन्यासाठी खेळपट्टी कोरडी करणे हेही मोठे आव्हान असणार आहे


दरम्यान शुक्रवारी 25 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर वाऱ्याचा वेग 56 किमी/तास असेल. कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. टी20 प्रमाणे आता वनडे मालिकेतला पहिला सामना देखील रद्द होण्याची शक्यता आहे.  


दोन्ही संघ 


टीम इंडिया :  शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, दीपक चहर आणि उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउदी.


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक


25 नोव्हेंबर 1ली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर 2री वनडे, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर 3री वनडे, क्राइस्टचर्च


हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्युझीलंड (New Zealand) संघाचा 3 सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 ने पराभव करत मालिका खिशात घातली होती. आता शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पहावे लागणार आहे.