IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?
IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते?
India vs New Zealand 1st ODI: टीम इंडियाने (team India) नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) हे दोन्ही विकेटकिपर बॅटसमन असणार आहेत. मात्र या दोघांपैकी शिखर धवन कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे. ( IND vs NZ 1st ODI Match Rishabh Pant Or Sanju Samson Who Will Get Chance Captain Shikhar Dhawan Will Give Marathi News )
हे ही वाचा : IND vs NZ पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?
संजू सॅमसनची निवड
गेल्या अनेक महिन्यापासून संजू सॅमसनचा (Sanju Samson) भारताच्या संघात समावेश करून घ्यावा अशी मागणी क्रिकेट फॅन्स सोशल मीडियावर करत होते. यासाठी संजू सॅमसन ट्विटरवर ट्रेंड देखील करण्यात आला होता. संजू सॅमसनला डावलंल जातं, त्याला संघात संधी दिली जात नाही, असे अनेक आरोप देखील क्रिकेट फॅन्स करत होते. या आरोपानंतर आता न्युझीलंडविरूद्ध वनडे सामन्यासाठी संजू सॅमसनची निवड झाली आहे. मात्र या मालिकेत संजू व्यतिरीक्त ऋषभ पंत (Rishabh Pant) देखील असल्याने, या दोघांपैकी कोणाला संधी देण्यात येणार आहे, असा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
हे ही वाचा : Suryakumar Yadav चा विदेशात देसी तडका, PHOTO आले समोर
ऋषभ पंत फ्लॉप
गेल्या काही महिन्यांपासून ऋषभ पंत (Rishabh Pant) आऊट ऑफ फॉर्म आहे. टी20 वर्ल्ड कपमध्येही त्याला खास अशी कामगिरी करता आली नाही. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात ओपनिंग करताना तो धावा करण्यात सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे सततच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याच्या संघात कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ऋषभ पंतला (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 3 अर्धशतके झळकावता आली आहेत.त्याने टीम इंडियासाठी 66 टी-20 सामन्यांमध्ये 987 धावा आणि 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 840 धावा केल्या आहेत. तसेच जेव्हा-जेव्हा टीम इंडियाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असते, त्यावेळेस तो सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.
संजू सॅमसनचा परफॉर्मन्स
टीम इंडियाच्या संघात जितकी संधी ऋषभ पंतला (Rishabh Pant) मिळाली आहे, तितकी संधी संजू सॅमसनला (Sanju Samson) मिळू शकली नाहीए. तो सध्या खुप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने अनेक सामने स्वबळावर टीम इंडियाला जिंकून दिले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 294 धावा केल्या आहेत.
दरम्यान या दोघांची तुलना पाहता ऋषभ पंत (Rishabh Pant) संध्या ऑऊट ऑफ फॉर्म आहे, तसेच त्याला संजूच्या (Sanju Samson) तुलनेत जास्त संधी मिळाली नाही आहे. तर संजूबद्दल बोलायच झालं तर त्याला फारच कमी संधी मिळाली आहे. तसचे तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. त्यामुळे कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्याची शक्यता आहे.