India vs New Zealand 2nd ODI Pitch And Weather Report : भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारीला होणार आहे. पाहुण्या संघासाठी हा सामना 'करो या मरो' असा असणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत 1-0 ने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार असून त्यामध्ये किवींना विजयी पताका लावावीच लागणार आहे. या सामन्याआधी खेळपट्टी आणि हवामान कसं आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामानाचा अंदाज-
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 जानेवारीला दुपारनंतर रायपूरमध्ये काही प्रमाणात थंड वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअस आणि पारा 19अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं. त्यामुळे सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. 


खेळपट्टी कशी असणार? 
रायपूरची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. टी-20 सामन्यांमध्ये सरासरी 170 च्या आसपास धावा होतात. मात्र पहिली बॅटींग झाल्यावर नंतर खेळपट्टी थोडी मंद होत जाईल. याचा फायदा वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. 


टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय महत्त्वाचा?
टॉस झाल्यावर प्रत्येक संघाने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला असून तोच भल्याचा ठरणार आहे. कारण प्रथम बॅटींग करत मोठा स्कोर उभा केल्यावर दुसरा संघाचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करताना फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकू शकतात.


दरम्यान, न्यूझीलंडने उद्याचाही सामना गमावल्यावर त्यांचं भारतात मालिका विजयाचं स्वप्न आणखी लांबणार आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 34 वर्षांमध्ये भारतामध्ये सहा मालिका खेळल्या आहेत मात्र त्यांना एकदाही विजयाची चव चाखता आली नाही. आताही मालिकेमध्ये भारताने पहिला सामना खिशात घालत आघाडी घेतली आहे. दुसराही सामना किवींनी गमावला तर रोहित अँड कंपनी विजयी आघाडी घेतील.


भारताकडून मागील सामन्यामध्ये दोन विकेट्स घेणारा कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन रायपूरच्या पीचवर त्यांच्या गोलंदाजीने कमाल करून दाखवू शकतात. रोहित शर्मा टॉस जिंकत सुरूवातील बॅटींग करण्याचा निर्णय घेऊ शकतो.


भारताचा एकदिवसीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक