Ind vs Nz 3rd Odi : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड (India Vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतेय. या मालिकेतला पहिला सामना न्यूझीलंडने (New Zealand) जिंकला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे न्युझीलंड मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. आता तिसऱ्या सामन्याचा निकाल काय लागतो, हे पाहावे लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) मोठा विक्रम करण्याची संधी आहे. त्यामुळे सुर्या या विक्रमाला गवसणी घालतो का हे पाहावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : Team India च्या सिलेक्टर्सच्या शर्यतीत 'या' माजी खेळाडूचे नाव? 


टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील तिसरा सामना हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. हा सामना सुर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) खुप महत्वाचा असणार आहे.कारण या सामन्यात त्याला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात जर सूर्यकुमार यादवने पुन्हा आपल्या फलंदाजीने चमक दाखवली आणि 5 सिक्स ठोकले तर तो रोहित शर्माचा विक्रम मोडू शकतो. 


सुर्या बनणार सिक्सरकिंग


रोहितने (Rohit Sharma) 2019 मध्ये एकूण 78 सिक्स मारले होते.आता जर सूर्या (Suryakumar Yadav) तिसऱ्या वनडे सामन्यात 5 सिक्स मारण्यात यशस्वी ठरला तर तो रोहितचा हा खास विक्रम मोडेल. यासोबत तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाजही बनेल. खरं तर, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे


रोहित शर्मा टॉपवर


एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत हिट मॅनने वर्चस्व गाजवले आहे. रोहितने (Rohit Sharma) 2019 मध्ये एकूण 78 सिक्स मारले होते, तर 2018 मध्ये त्याने 74 सिक्स मारले होते आणि 2017 मध्ये त्याने 65 सिक्स मारले होते. याशिवाय 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्सने एका वर्षात आपल्या बॅटने एकूण 63 सिक्स ठोकण्यात यश मिळवले होते.


दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून (India Vs New Zealand) पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर दुसरी वनडे पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे न्यूझीलंड वनडे मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा वनडे निर्णायक असणार आहे. जर हा सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. आणि जर टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला, न्युझीलंड (New Zealand) मालिका खिशात घालेल. त्यामुळे आता काय निकाल लागतो हे पाहावे लागणार आहे.