ind vs nz 3rd t20 ahmedabad shubman gill scored hundred: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या टी-20 सामन्यामध्ये भारताचा सलामीवर शुभमन गिलने (Shubman Gill) षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला आहे. शुभमनने दमदार फलंदाजी करताना अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. शुभमन आणि कर्णधार हार्दिक पंड्याच्या जोडीने 42 चेंडूंमध्ये 103 धावांची भागीदारी केली. शुभमनचं हे टी-20 मधील पहिलं शतक असून यापूर्वी त्याचा या फॉरमॅटमधील सर्वोच्च स्कोअर 46 इतका होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. शुभमने चौकार लगावत आपलं शतक साजरं केलं. 54 चेंडूंमध्ये शतक झळकावताना त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ 15 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या. शुभमने 187 च्या सरासरीने आपलं शतक साजरं केलं.


शतक झळकावल्यानंतर शुभमन अधिकच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. शुभमन या सामन्यामध्ये 63 चेंडूंमध्ये 126 धावा करत नाबाद राहिला. आपल्या खेळीमध्ये शुभमने एकूण 7 षटकार आणि 12 चौकार लगावले. म्हणजेच त्याने त्याच्या 126 धावांपैकी 90 धावा या केवळ चौकार आणि षटकराच्या माध्यमातून केल्या.


भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 235 धावांचा आव्हान ठेवलं आहे. भारताने टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीवर आहे. या मालिकेतील पाहिला सामना न्यूझीलंडने जिंकला तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना हा निर्णयाक असून आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.