Ind vs Nz 3rd T20i Shubman Gill Century: भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध (ind vs nz 3rd t20i) खेळवण्यात येत असलेल्या टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये भारताचा सालामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) दमदार कामगिरी केली आहे. पाहुण्या संघाविरोधात शुभमनने शतक झळकावत सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये शुभमन सातत्याने अपयशी ठरत असल्याची टीका करणाऱ्या टीकाकारांची तोंड बंद केली आहे. शुभमनने जानेवारी महिन्यामध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने केवळ शतकच झळकावलं नाही तर एक अनोखा विक्रमही आपल्या नावे करुन घेतला आहे जो रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या टी-20 मधील दिग्गजांनाही जमला नाही. 


शुभमनची दमदार खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमनबरोबर सलामीला आलेला ईशान किशन स्वस्तात तंबूत परतला. मात्र दुसऱ्या बाजूने शुभमन गिल धावा जमत अगदी नाबाद राहिला. संपूर्ण 20 षटकं फलंदाजी करताना शुभमनने दमदार शतक झळकावलं. तशी टी-20 मध्ये शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी फारच छोटी आहे. या यादीमध्ये केवळ चारच जणांचा समावेश आहे. रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहलीबरोबरच दीपक हुड्डाने टी-20 मध्ये शतक झळकावलं आहे. आज शुभमन गिलने या मानाच्या यादीत स्थान मिळवलं. शुभमनने या सामन्यामध्ये 63 चेंडूंमध्ये नाबाद 126 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 7 षटकार आणि 12 चौकार लगावले. म्हणजेच त्याने त्याच्या 126 धावांपैकी 90 धावा चौकार आणि षटकराच्या माध्यमातून केल्या. शतक साजरं केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर शुभमनने षटकार लगावला. शतक साजरं करताना शुभमनच्या नावावर 5 षटकार आणि 10 चौकार होते. शतक साजरं झाल्यानंतर त्याने आणखीन दोन षटकार आणि दोन चौकार लगावत 126 धावांपर्यंत मजल मारली. याचबरोबर त्याने टी-20 मध्ये विराट आणि रोहितलाही न जमलेला विक्रम आपल्या नावे करुन घेतला.


विराट आणि रोहितलाही जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं


शुभमने टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाला करता आला नाही एवढा मोठा स्कोअर केला. शुभमनच्या आधीही 4 भारतीय खेळाडूंनी या शॉर्ट फॉरमॅटमध्ये शतकं झळकावली आहेत. मात्र कोणालाही 126 धावांपर्यंत मजल मारता आलेली नाही. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली हा 122 धावांसहीत पहिल्या क्रमांकावर होता. मागील वर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये विराटने अफगाणिस्तानवरुन ही 122 धावांची खेळी केली होती. रोहितचा टी-20 मधील सर्वोच्च स्कोअर हा 118 इतका आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ही धावसंख्या उभारली आहे. आज शुभमनने वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत या दोघांना मागे टाकत टी-20 मध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला आहे.