India vs New Zealand : टीम इंडियाचा म्होरक्या चांगल्या फॉर्ममध्ये असताना टीम साऊदीने भारताला मोठा धक्का दिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आतिशबाजी करत 47 धावा करत बाद झाला, केन विलियम्सनच्या (Kane Williamson) एका भन्नाट कॅचमुळे रोहितला तंबुत जावं लागलं. रोहित बाद झाला अन् सर्वांच्या नजरा होत्या, विराट कोहली याच्यावर... विराट (Virat Kohli) मैदानात आला अन् विराट विराटच्या घोषणा सुरू झाल्या. विराट न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकणार का? असा सवाल विचारला जात असताना किंवींकडून एक जोरदार अपील करण्यात आली. त्यामुळे स्टेडियममध्ये भयान शांतता दिसून आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन् बॉल विराटच्या पॅडवर आदळला. त्यावेळी किवी खेळाडूंनी जोरदार अपील केली. त्यांच्यासाठी विराट नावाच्या वादळाची विकेट होती. कॅप्टन केनने देखील संधी सोडली नाही. त्याने रिव्ह्यूव घेतला अन् सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्टपणे दिसू लागलं. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. 


थर्ड अंपायरने अपील रिव्ह्यूव केली केली तेव्हा विराटच्या बॅटला कट लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे विराटला नॉट आऊट देण्यात आलं. विराट मैदानावर खेळणार, याची खात्री पटताच अनुष्काने देखील सुटकेचा श्वास घेतला.


पाहा Video



न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.