Ind vs Nz: दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी मोठा दिलासा, हा खेळाडू खेळण्यासाठी फीट
`विराट आर्मी`साठी मोठी बातमी आली आहे
मुंबई : ICC T20 world cup 2021 मध्ये टीम इंडियाला 31 ऑक्टोबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. याआधी 'विराट आर्मी'साठी मोठी बातमी आली आहे. (Hardik pandya feet to Play)
'हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट'
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) पुढील सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. संघातील त्याची भूमिका फिनिशरसारखी आहे. तो सध्या गोलंदाजी करत नाहीये.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, हार्दिक पांड्या फीट आहे, तो म्हणाला, 'काहीही अडचण नाही. सावधगिरी म्हणून तो स्कॅन केला. काल (रविवार) स्पर्धेचा पहिला सामना असल्याने संघ व्यवस्थापनाला रिस्क घ्यायची नव्हती.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. त्याच्या जागी इशान किशनने संपूर्ण सामन्यात क्षेत्ररक्षण केले.