New Zealand T20 Squad For India Series: श्रीलंकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यासाठी तयार रहावं लागणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाला (IND vs NZ) प्रथम वनडे सिरीज (ODI Series) खेळवण्यात येणार असून त्यानंतर टी 20 (T20 Series) सिरीज देखील खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजसाठी न्यूझीलंडच्या टीमची (New Zealand cricket team) घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यांच्या टीममध्ये कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि अनुभवी गोलंदाज टीम साऊदीचा (Tim Southee) समावेश करण्यात आलेला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand cricket board) या दोघांना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे.


कर्णधारपदाची धुरा 'या' खेळाडूकडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टीमच्या कर्णधारपदाची धुरा मिचेल सँटनरला (Mitchell Santner) देण्यात आलेली आहे. मिचेलने पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात चांगला खेळ दाखवला होता. भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 सिरीज 27 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 


बेन लिस्टरला पहिल्यांदाच मिळाली टीममध्ये एन्ट्री


वेगवान गोलंदाज बेन लिस्टर आणि हेनरी शिपले यांना 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजसाठी सिलेक्ट करण्यात आलं आहे. याशिवाय स्पिन ऑलराउंडर मायकल रिपन याला देखील टीममध्ये संधी देण्यात आली आहे. रिपनने गेल्या वर्षी स्कॉटलंडविरूद्ध पदार्पण केलं होतं.


न्यूझीलंडच्या टीमचे सिलेक्टर गेविन लार्सन यांनी सांगितलं की, लिस्टरने सर्व फॉरमॅटमध्ये त्याच्या उत्तम खेळाने प्रभावित केलंय. त्यामुळे त्याची पहिल्यांदाच टीममध्ये निवड झालीये.


'बेन लिस्टरने ऑकलंडसाठी खेळलेल्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2017 मध्ये पदार्पण केल्यानंतर, तो टी20 आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. डावखुरा गोलंदाज म्हणून देखील त्याने चांगली कामगिरी केली असल्याचं, गेविन लार्सन म्हणाले आहेत.


भारता विरूद्ध टी20 सीरीजसाठी कशी असेल न्यूझीलंडची टीम (New Zealand T20 Squad)


मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेन क्लीवर, डेवोन कॉन्वे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपले, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर.


न्यूजीलंडचा भारत दौरा (संपूर्ण शेड्यूल):


  • पहिली वनडे- 18 जानेवारी, हैदराबाद

  • दूसरी वनडे- 21 जानेवारी, रायपुर

  • तीसरी वनडे - 24 जानेवारी, इंदूर

  • पहिली टी20- 27 जानेवारी, रांची

  • दूसरी टी20- 29 जानेवारी, लखनऊ

  • तीसरी टी20- 1 फेब्रुवारी, अहमदाबाद