नवी दिल्ली : न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने सुरेश रैनाचा रेकॉर्ड तोडला आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या नावावर २६४ सिक्सर होते आणि तो रैनापेक्षा केवळ या सिक्सरने मागे होता. फिरोजशहा कोटला मैदानावर अर्धशतकीय खेळीदरम्यान ४ सिक्सर लगावले. त्यानुसार आता रोहित शर्माच्या नावावर २६८ सिक्सर झाले आहेत. 


दुस-या क्रमांकावर रैना


मिडल ऑर्डरचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने २६५ सिक्सर लगावले आहेत. ओव्हरऑल बघायला गेलं तर वर्ल्ड रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ७७२ सिक्सर लगावले आहेत. 


युवराज तिस-या क्रमांकावर 


सर्वाधिक सिक्सर लगावणा-या बॅट्समनच्या भारतीय यादीत तिसरा क्रमांक ऑलराऊंडर युवराज सिंह याचा येतो. त्याने २०६ सामन्यांमध्ये २४४ सिक्सर लगावले आहेत. 


चौथ्या क्रमांकावर धोनी


चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आहे. त्याच्या नावावर २६९ सामन्यांमध्ये २२७ सिक्सर आहेत. हे सिक्सर त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात लगावले आहेत. 


पठाणचे २२१ सिक्सर


गुजरातचा दिग्गज बॅट्समन युसूफ पठाण याने २३२ सामन्यांमध्ये २२१ सिक्सर लगावले आहेत. 


विराट सहाव्या क्रमांकावर 


या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने २२४ सामन्यांमध्ये २१८ सिक्सर लगावले आहेत.