वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये ०-३ने पिछाडीवर पडल्यानंतर न्यूझीलंडची टीम उरलेल्या २ मॅचमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्यातच आता न्यूझीलंडने त्यांच्या वनडे टीमचीही घोषणा केली आहे. ५ फेब्रुवारीपासून ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजसाठीही न्यूझीलंडच्या दुखापतग्रस्त खेळाडूंचं टीममध्ये पुनरागमन झालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडने ६ फूट ८ इंचाचा फास्ट बॉलर काईल जेमीनसनला संधी दिली आहे. काईलशिवाय स्कॉट कुजेगलिन आणि हामीश बेनेट यांचीही टीममध्ये निवड झाली आहे. बेनेट आणि कुजेगलिनने २०१७ साली आयर्लंड दौऱ्यात शेवटची वनडे मॅच खेळली होती.


जेमीनसनला लॉकी फर्ग्युसनऐवजी टीममध्ये संधी मिळाली आहे. फर्ग्युसन अजूनही दुखापतीतून सावरला नाही. याशिवाय ट्रेन्ट बोल्ट, मॅट हेन्री यांनादेखील दुखापतीमुळे या सीरिजला मुकावं लागणार आहे.


न्यूझीलंडची टीम २०१९ जुलैमध्ये खेळलेल्या वर्ल्ड कप फायनलनंतर पहिलीच वनडे मॅच खेळणार आहे. ३ मॅचच्या या वनडे सीरिजची पहिली मॅच ५ फेब्रुवारीला हॅमिल्टनमध्ये, दुसरी वनडे ८ फेब्रुवारीला ऑकलंडमध्ये आणि तिसरी वनडे ११ फेब्रुवारीला माऊंट मांगनुईमध्ये खेळवण्यात येणार आहे.


वनडे सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीममध्ये २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान पहिली टेस्ट वेलिंग्टनमध्ये आणि २९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान दुसरी टेस्ट क्राईस्टचर्चमध्ये होईल.


न्यूझीलंडची वनडे टीम


केन विलियमसन (कर्णधार), हामीश बेनेट, टॉम ब्लेंडल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, मार्टीन गप्टील, काईल जेमीनसन, स्कॉट कुजेगलिन, टॉम लेथम, जीमी नीशम, हेनरी निकोलस, मिचेल सॅन्टनर, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर