India vs New Zealand 1st ODI : टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात शुक्रवार  25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (ODI Series) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ऑकलंडमध्ये सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची ऑकलंडमधील कामगिरी फार निराशाजनक आहे. टीम इंडियाला गेल्या 19 वर्षात एकही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे शिखर धवन आपल्या नेतृत्वात टीम इंडिया 19 वर्षांनंतर विजय मिळवून देणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (ind vs nz odi series head to head records team india never win match after 2003 at auckland)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ऑकलंडमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना 2003 मध्ये जिंकला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला एकदाही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही.  


टीम इंडियाची न्यूझीलंडमधील आकडेवारी


टीम इंडियाने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये एकूण 9 एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत.  यापैकी फक्त 2 सीरिजमध्येच टीम इंडियाचा विजय झालाय. तर 5 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय.  


हेड टु हेड रेकॉर्ड


उभयसंघात आतापर्यंत 110 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने 55 सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवलाय. तर न्यूझीलंडचा मात्र 49 वेळा विजय झालाय. तर 5 सामने हे अनिर्णित राहिल्यात.  त्यामुळे आता या मालिकेतील पहिल्या सामन्यात काय होतंय याकडे क्रिकेट चाहते लक्ष देऊन आहेत.  


वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, दीपक चहर आणि उमरान मलिक.


टीम न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर आणि टिम साउदी.