Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले
IND vs NZ 1st ODI : टी20 नंतर वनडेतही फ्लॉप! या ऋषभ पंतच करायचं काय? तुम्हाला काय वाटतं?
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा (Team India) विकेटकिपर बॅटसमन ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. हा त्याचा आऊट ऑफ फॉर्म आता वनडेतही कायम आहे. त्यामुळे आता त्याला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही, असा प्रश्न कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) पडलाय.त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळते की त्याला संघातून ड्रॉप केले जाते? हे पहावे लागणार आहे.
हे ही वाचा : उमरान मलिकची वनडेत डेब्यूत कमाल! पहिल्याच बॉलवर..., पाहा VIDEO
वनडेत खराब कामगिरी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही अपयशी ठरला आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऋषभ पंत अवघ्या 15 धावा करून बाद झाला होता.
ऋषभ पंत (Rishabh Pant) न्युझीलंड विरूद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. या सामन्यात पंत आपला खराब फॉर्म मागे टाकून मोठी खेळी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. 15 धावांच्या स्कोअरवर पंतने लॉकी फर्ग्युसनचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅटला कट लागून तो विकेटकिपरच्या हातात गेला आणि तो बाद झाला होता.
टी20 तही निराशा
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतला (Rishabh Pant) सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीला आलेल्या पंतने (Rishabh Pant Batting) केवळ 6 धावा केल्या होत्या. त्याचवेळी तिसऱ्या टी-20 सामन्यात तो केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
शेवटच्या 5 सामन्यात फ्लॉप
ऋषभ पंतच्या (Rishabh Pant Batting) शेवटच्या पाच डावांवर नजर टाकली तर, त्याने मागील पाच डावांमध्ये 6,3,6,11,15 धावा केल्या आहेत. 2022 मधील त्याची टी-20 कामगिरी पाहता त्याने यावर्षी 21 डावांत केवळ 21.21 च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. पंतचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
दरम्यान टीम इंडियात (Team India) संधी मिळून सुद्धा ऋषभ पंतचा (Rishabh Pant Batting) खराब फॉर्म अजूनही काय आहे. त्यात असे अनेक खेळाडू आहेत, जे संघाबाहेर असून चांगली कामगिरी करत आहे. या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत स्वत:ला सिद्ध करतो की त्याला बेंचवर बसवले जाते, हे पाहावे लागणार आहे.