कोलकाता : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पण तरीही रोहितची सेना क्लीन स्वीपसाठी आग्रही राहील. तिसऱ्या T20 मध्ये रोहित त्याच्या संघात नक्कीच काही मोठे बदल करेल हे नक्की. पहिल्या दोन T20 मध्ये दोन खेळाडूंची कामगिरी खूपच खराब होती, त्यानंतर त्यांचा असा खराब फॉर्म पाहाता कॅप्टन रोहित शर्मा त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार नाही हे नक्की.


1. दीपक चहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दीपकने दोन्ही टी-20 सामन्यात फलंदाजांना भरपूर धावा दिल्या आहेत. त्याच बरोबर तो विकेट घेण्यातही असमर्थ ठरला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात महागड्या ठरलेल्या दीपकने दुसऱ्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये सुमारे 10 च्या सरासरीने 42 धावा दिल्या, तर त्याला फक्त 1 बळी मिळाला. दीपक चहर हा संघाचा कमजोर खेळाडू ठरत आहे.


डावाच्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून संघाला काही यश मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तो पूर्ण अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात त्याचे संघा बाहेर बसणे जवळपास निश्चित आहे.


2. भुवनेश्वर कुमार


टीम इंडियाचा सर्वात दिग्गज आणि जुना गोलंदाज भावेश्वर कुमार गेल्या काही महिन्यांपासून आपल्या जुन्या लयीत दिसत नाही. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यानंतरही भुवीला वगळण्यात आले होते. न्यूझीलंड दौऱ्यावर तो चांगला पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी चांगली होती, मात्र दुसऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा खराब गोलंदाजी करताना दिसला.


त्याने 4 ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या. भुवीचा तो जुना स्विंगही आता दिसत नाही. आयपीएल 2021 मध्येही भुवीने काही खास कामगिरी केली नाही. त्याच्या जागी आज युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी दिली जाऊ शकते. आयपीएलच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आवेशने दुसरे स्थान पटकावले.


टीम इंडिया क्लीन स्वीप करेल का?


टीम इंडियाने मालिका आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. जयपूर येथे झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघाने किवी संघाचा 5 गडी राखून तर रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. तिसरा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून क्लीन स्वीप करू इच्छितो.


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल.