Shubman Gill Century : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill Century) बॅट न्यूझीलंड विरूद्ध चांगलीच तळपली आहे.शुभमन गिलने दीडशतकी खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat Kohli) यासह अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. तसेच शुभमन गिलने आता टीम इंडियात (Team India) सलामीची जागा आणखीण पक्की केली आहे. दरम्यान त्याने या सामन्यात रेकॉर्ड काय केलाय, हे जाणून घेऊयात.  (ind vs nz shubman gill breaks virat kohli became the fastest batsman to score 1000 odi runs team india rajiv gandhi international stadium)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर इतक्या धावांचे आव्हान


 


वनडेतले तिसरे शतक


न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने  87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे. दरम्यान याआधीच्या सामन्यात गिलने श्रीलंकेविरुद्ध 116 धावांची खेळी केली होती.


 


हे ही वाचा : रो'हिट' शर्मा! टीम इंडियाचा बनला नवीन 'सिक्सर किंग', 'हा' रेकॉर्ड ब्रेक


 


सर्वाधिक जलद 1000 धावा 


शुभमन गिलने (Shubman Gill)हे शतक ठोकताच आपल्या नावे एक खास विक्रम केला आहे. गिल हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ही खेळी करून गिलने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय. कारण  गिलने 19 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. तर कोहलीने कारकिर्दीतील 24 व्या वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. 


पाकिस्तानचा खेळाडू टॉपवर


दरम्यान वनडेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर आहे.फखरने 18 वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर इमाम-उल-हक आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये हा पराक्रम केला. गिलने (Shubman Gill) 19व्या वनडेत करिअरच्या 1000 धावा पूर्ण करत इमामची बरोबरी साधली आहे. 


 शुभमन गिलने (Shubman Gill) या जलद धावा ठोकत व्हिव्हियन रिचर्ड्स, केविन पीटरसन यांसारख्या दिग्गजांना पराभूत केले आहे. सध्या गिल मैदानात तुफान बॅटींग करत असून त्याने दीड शतकी खेळी केली आहे. या त्याच्या खेळीने टीम इंडियाला न्यूझीलंडसमोर मोठी धावसंख्या उभारता येणार आहे.