Shubman Gill Double Century : टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) बॅट न्यूझीलंडविरूद्ध (Ind Vs NZ) चांगलीच तळपली आहे. शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने (Team India Win) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे. तर लॉकी फर्ग्युसन,ब्लेर टिकनर आणि मिचेल सॅन्टनरने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. (ind vs nz shubman gill hits double century new zealand need 350 runs to win team india rajiv gandhi international stadium)


हे ही वाचा : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubman Gill) उतरले होते. दोघांनी सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली होती. या फटकेबाजीत रोहित शर्मा 34 धावा करून आऊट झाला. त्यानंतर उतरलेला विराट कोहली आणि ईशान किशन एकेरी धावसंख्या करून आऊट झाले होते. विराटने 8 तर ईशानने 5 धावा केल्या. त्यामुळे मैदानात शुभमन एकाकी झूंज देत होता. 


हे ही वाचा : रो'हिट' शर्मा! टीम इंडियाचा बनला नवीन 'सिक्सर किंग', 'हा' रेकॉर्ड ब्रेक


ईशान किशनच्या विकेटनंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यादवने गिलची (Shubman Gill) पुरेपुर साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील 31 धावा करून बाद झाला.मात्र या दरम्यान एक बाजू संभाळून शुभमन गिल फटकेबाजी करत होता आणि त्याने सेंच्यूरी ठोकली. त्यानंतर त्याने दीड शतकी देखील केली. त्याला टीम इंडियाकडून कोणत्याच खेळाडूची साथ मिळत नव्हती. मात्र तो आपली वादळी खेळी करत होता.


शुभमन गिलची डबल सेंच्यूरी


सुर्या आऊट झाल्यानंतर हार्दीक पंड्या 28, वॉशिग्टन सुंदर 12 आणि शार्दूल ठाकूर 3 धावा करून आऊट झाला. टीम इंडियाचे एका मागोमाग एक विकेट पडत असताना शुभमन गिल (Shubman Gill Double Century) मात्र चांगल्या लयीत खेळत होता.त्याने डबल सेंच्यूरी देखील ठोकली. मात्र या सेच्यूरीनंतर तो बाद झाला. टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. 


शुभमन गिलच्या 208 धावाच्या बळावर टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान न्यूझीलंड पुर्ण करते की टीम इंडियाचे बॉलर्स त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.