दुबई: भारत विरुद्ध किवी आज सामना होत आहे. टीम इंडियासाठी करो या मरोचा सामना असणार आहे. याचं कारण म्हणजे टीम इंडियाच्या हातून हा सामना गेला तर जवळपास सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याचा टीम इंडियाचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला आता पहिली फलंदाजी करावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल  करण्यात आले आहेत. सुर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला या सामन्यात संधी देण्यात आली नाही. तर हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. टीम इंडियामध्ये शार्दूल ठाकूर आणि ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.


सूर्यकुमार यादवला आरामाची आवश्यकता असल्याने त्याला या सामन्यात संधी देण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कदाचित तो खेळू शकेल. तर हार्दिक पांड्या खेळणार की नाही या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन


विराट कोहली, ईशान किशन, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, बुमराह, वरूण चक्रवर्ती, आणि के एल राहुल


न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन


मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन (कर्णधार), जेम्स नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साऊदी



काय सांगतात हेड टू हेड


भारत विरुद्ध न्यूझीलंड आजचा सामना 17 वा असणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ 16 वेळा आमने सामने आले आहेत. याआधी झालेल्या 16 सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचं पारडं जास्त जड आहे. याचं कारण म्हणजे न्यूझीलंड संघ 8 सामने जिंकला आहे. तर टीम इंडियाला केवळ 6 सामने जिंकण्यात यश मिळालं आहे. तर 2 सामने टाय झाले आहेत.