India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त `हेच` लोक घेऊ शकणार
Cricket News Marathi: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.
Ind vs NZ: भारतीय क्रिकेट संघ ( Team India)आता न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून न्यूझीलंडच्या संघासोबत 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandhya) टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघाची ताकद हे एकसमान असून टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
या कारणामुळे सामना TV ला पाहता येणार नाही
या मालिकेकडे टीम इंडियाच्या चाहत्यांचे लक्ष लागले असताना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. ती म्हणजे भारत-न्यूझीलंडची मॅच तुम्हाला टीव्हीला पाहता येणार नाही. कारण न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात प्राइम व्हिडिओवर होईल. म्हणजेच ज्यांनी प्राइम व्हिडिओचे सदस्यत्व घेतले आहे, तेच लोक या मालिकेचा आनंद घेऊ शकतील. सोनी टिव्ही आणि स्टार स्पोर्ट्स या वाहिन्यांकडे प्रसारण करण्याचे अधिकार नाहीत. विशेष म्हणजे डीडी स्पोर्ट्स यांचं प्रसारण करु शकते. कारण अधिकतर टीम इंडियाच्या मॅच डीडी स्पोर्ट्सवर दाखवल्या जातात.
दोन्ही संघांचे संघ जाहीर
भारत-न्यूझीलंडचा पहिला सामना 18 नोव्हेंबरला म्हणजेच (आज) होणार आहे. आता दोन्ही संघांना T20 विश्वचषकातील पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून पुढे जावे लागेल. कारण टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून (Pak vs NZ) पराभव झाला होता. आता आगामी मालिका जिंकून दोन्ही संघांना सकारात्मक सुरुवात करत आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी दोन्ही संघांनी संघ जाहीर केला आहे.
वाचा: विकेंडला लोकलचा लॉकडाऊन! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
न्यूझीलंड विरुद्ध भारत थेट सामन्याची वेळ
भारताच्या वेळेनुसार, 3 टी-20 सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग (Live streaming) दुपारी 12 वाजल्यापासून असेल, तर एकदिवसीय सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून असेल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पाहणार
न्यूझीलंड आणि भारत (Ind vs NZ ) यांच्यातील मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात प्राइम व्हिडिओवर होईल. म्हणजेच ज्यांनी प्राइम व्हिडिओचे सदस्यत्व घेतले आहे, तेच लोक या मालिकेचा आनंद घेऊ शकतील.
भारतात टीव्हीवर नाही होणार थेट प्रक्षेपण
न्यूझीलंड-भारत T20आणि एकदिवसीय मालिका टीव्हीवर नव्हे तर OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर थेट प्रवाहित केली जाईल.
भारतीय T20 संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंह, हरदीप सिंह, अरविंद यादव. पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
भारत एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, युजवेंद्र चहल सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक
न्यूझीलंड T20 संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.
न्यूझीलंड एकदिवसीय संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.