India Tour South Africa 2021 | दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंना दुखापत
टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे जखमी झाले आहेत.
मुंबई : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा आणि दुसरा सामना खेळत आहे. या सीरिजनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही 26 डिसेंबरपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचं सावट होतं. मात्र बीसीसीआयने या दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान यानंतर आता टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे जखमी झाले आहेत. (ind vs nz test series 2021 team india 2 star players who have injured before to south africa tour)
मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात फिल्डिंग करु शकत नाहीत. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. या दोघाच्यां जागी सूर्यकुमार यादव आणि केएस भरत मैदानात आले.
दुसऱ्या डावात बॅटिंग करताना मयंकच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्याला खबरदारी म्हणून मैदानात न उतरण्याचा सल्ला दिला.तिसऱ्या दिवसातील तिसरं सत्र सुरु झाल्यानंतर बीसीसीआयने ही माहिती दिली.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्या पहिल्या डावात फिल्डिंग करताना गिलला दुखापत झाली. जयंत यादव 19 वी ओव्हर टाकत होता. जयंत नो बॉल टाकला. यावर कायले जेमीन्सने फटका मारला. गिलने ही कॅच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. बीसीसीआयने ही माहिती दिली.
दोघेही तुफान फॉर्मात
मयांकने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शानदार 150 धावांची खेळी केली. तर त्यानंतर दुसऱ्या डावात 62 धावा केल्या.
तर शुबमनला दोन्ही डावात शानदार सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. दरम्यान हे दोघए स्टार खेळाडू या आफ्रिका दौऱ्याआधी दुखापतीतून सावरायला हवेत. नाहीतर हा टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल.