IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिजखेळवण्यात येणार असून यातील पहिला टेस्ट सामना हा 16 ऑक्टोबर पासून बंगळुरू येथे सुरु आहे. या टेस्ट सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे वाया गेला. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी टॉस झाला आणि तो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला. परंतु बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये क्लीन स्वीप देणारी टीम इंडिया न्यूझीलंड समोर फलंदाजीच्या पहिल्याच इनिंगमध्ये झिरो ठरलेली दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. परंतु  न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजी समोर टीम इंडियाचे फलंदाज एका मागोमाग एक बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाकडून सुरुवातीला यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. तेव्हा यशस्वी 13 तर रोहित अवघ्या 2 धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर ऋषभ पंत (20) वगळता कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन इत्यादी तब्बल ५ फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कुलदीपने 2, बुमराहने 1 तर सिराजने 4 धावा केल्या. परिणामी टीम इंडियाला 46 धावांवर ऑल आउट व्हावे लागले. 


हेही वाचा : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट


 


न्यूझीलंडकडून गोलंदाज मॅट हेनरीने 5, विल्यम ओरुरकेने 4 तर साउथी 1 विकेट घेण्यात यशस्वी झाला. टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सीरिज 2-0  ने आघाडी घेत जिंकली होती. यात भारताच्या खेळाडूंनी अनेक रेकॉर्डस् रचले. हाच फॉर्म टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा कायम ठेवेल अशी अपेक्षा होती. परंतु भारत पहिल्या इनिंगमध्ये सपशेल अपयशी ठरला. 


टीम इंडियाने नावावर केला नकोसा विक्रम : 


टीम इंडिया फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंड समोर 46 धावांवर ऑल आउट झाली. हा टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोअरपैकी एक ठरला. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना टीम इंडिया 36 धावांवर ऑल आउट झाली होती. तर 1974 मध्ये लॉर्ड्स मैदानात इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 42 वर ऑल आउट झाली.  त्यानंतर आता पहिल्याच इनिंगमध्ये न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजी करताना टीम इंडिया 46 धावांवर ऑल आउट झाली आहे. 


भारताची प्लेईंग 11 :


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


न्यूझीलंडची प्लेईंग 11 :


टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके