World Cup 2023 IND vs PAK : शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात क्रिकेटचा हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) हा सामना खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 1 लाख 35 हजार प्रेक्षक संख्याची क्षमता असलेल्या या मैदानावर आयपीएलची फायनल देखील खेळवण्यात आली होती. अशातच उद्याच्या सामन्यावर आणि त्यापूर्वीच्या रंगारंग कार्यक्रमावर पावसाचं सावट (Ahmedabad Weather) असेल का? असा सवाल विचारला जात आहे. 


कसं असेल हवामान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याच्या (Ahmedabad Weather) म्हणण्यानुसार, 14 ऑक्टोबरला पावसाची शक्यता नाही. सामन्यादरम्यान आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असू शकते. त्यामुळे दिवसभरात जास्त उष्मा होण्याची शक्यता नाही. यामुळे प्रेक्षकांना विना उकाड्याची मजा घेता येणार आहे.


हेड टू हेड


भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात आतापर्यंत 134 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 56 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार पाकिस्तानचा वरचष्मा असला तरी वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला एकदाही भारताविरुद्ध जिंकता आलं नाही. भारताने आत्तापर्यंत पाकिस्तानला 7-0 ने पछाडलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 8-0 असा स्कोर करणार का? असा सवाल विचारला जात आहे.



टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.


पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.