IND vs PAK : `बीवी पाकिस्तान लेकिन दिल है हिंदुस्तानी`.. स्पेशल जर्शी घालत करणार इंडियाला सपोर्ट
त्याची पत्नी पाकिस्तानी आहे आणि तो भारताचा आहे आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे.
मेलबर्न : भारतीय संघ टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानशी (IND vs PAK) सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मेलबर्नमधील एमसीजी स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी होऊ लागली आहे.
India vs Pakistan T20 World Cup: करोडा क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबॉर्न क्रिकेट स्टेडिअमवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे.
आता थोड्यात वेळात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) भारतीयंना विजयाचं दिवाळी गिफ्ट देण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं क्षेत्ररणाचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानातील परिस्थिती पाहून घेतल्याचं रोहित शर्मानं सांगितलं.. 2021 टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पाकिस्तानचा 10 विकेटने पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल.स्थानिक वेळेनुसार हा सामना सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार होता, मात्र दुपारपासूनच चाहते तेथे पोहोचू लागले आहेत. (IND vs PAK cricket t20 worldcup fan wear half pakistan jersy half indian jersy come to cheerup india )
भारत-पाकिस्तानच्या अर्ध्या जर्सीतील फॅन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी संपूर्ण जग वाट पाहत आहे. यावेळी एका चाहत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. या व्यक्तीची जर्सी भलतीच चर्चेत आहे कारण त्याची अर्धी जर्सी भारताची आणि अर्धी पाकिस्तानची होती.
असं का विचारलं तर त्याने उत्तर दिलय कि त्याची पत्नी पाकिस्तानी आहे आणि तो भारताचा आहे आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. यासोबतच फॅन म्हणाला- 'बीवी पाकिस्तान लेकिन दिल है हिंदुस्तानी'. मी हा शर्ट घातला तेव्हाच पत्नीने परवानगी दिली. या सामन्यात तो भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला आहे. (IND vs PAK cricket t20 worldcup fan wear half pakistan jersy half indian jersy come to cheerup india )