IND vs PAK : चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फुटबॉल सामना होणार आहे. खेळ कोणताही असो, भारत पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेत असतो. भारत 21 जून ते 4 जुलै दरम्यान SAFF Championship खेळणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. 


भारत विरुद्ध पाकिस्तान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 21 जून रोजी होणार आहे. याशिवाय याच दिवशी अजून एक सामना असणार आहे. हा सामना कुवेत आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. यावेळी टीम इंडिया 5 वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2018 मधील सैफ कपच्या 12 व्या हंगामात खेळला गेला होता, भारताने 3-1 च्या स्कोअरसह सामना जिंकला होता. मात्र अंतिम सामन्यात मालदीवकडून भारताला पराभव स्विकारावा लागला.


राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार स्पर्धा


दोन्ही गटाचे सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. आठ देशांची ही स्पर्धा कांतिरवा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी दक्षिण आशियाबाहेरील लेबनॉन आणि कुवेत या दोन देशांना या स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तान 195 व्या क्रमांकावर असून भारत 101 व्या क्रमांकासह दुसरा संघ आहे.


SAFF Championship वर भारताचं वर्चस्व


भारताने आठ वेळा सॅफ कप जिंकलाय. याशिवाय चार वेळा उपविजेतेपद पटकावलंय. 2003 मध्ये ढाका येथे झालेल्या पाचव्या हंगामात भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं होतं. यानंतर टीमने तिसरा क्रमांक पटकावला. 1993 पासून, पाकिस्तानने 13 पैकी दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान अधिकृतपणे एकूण 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 


SAFF कप 2023चं वेळापत्रक:


21 जून: कुवेत विरुद्ध नेपाळ, दुपारी 3.30 आणि भारत विरुद्ध पाकिस्तान, 7.30 वाजता.


22 जून: लेबनॉन विरुद्ध बांगलादेश, दुपारी 3.30 आणि मालदीव विरुद्ध भूतान, संध्याकाळी 7.30