Pakistan Cricket Fans Video Viral : पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला आता हातावर मोडण्याइतके तास शिल्लक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. जवळपास लाखभर प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) उपस्थित राहून हा सामना पाहणार आहेत. अशातच आता भारताच्या कानाकोपऱ्यात देखील हा सामना पाहण्यासाठी जवळजवळ सर्व तयारी झालीये. अनेकांनी सुट्ट्या टाकल्यात, तर काहींनी मित्रांसोबत प्लॅन देखील बनवलाय. सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाईट देखील सुरू झालीये. अशातच आता पाकिस्तानी चाचाचा (Pakistani Chacha) एक व्हि़डीओ सध्या समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचत असताना एक फॅन "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा" अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, भारतीयांनी चाचाची चांगलीच खिल्ली उडवली. चाचा एकीकडे घोषणा देत होते, "जितगा भाई जितेगा..." त्यावर भारतीयांनी उत्तर दिलं, "इंडिया जितेगा..." भारतीयांच्या चाचाला उत्तर दिल्यानंतर नेमकं काय म्हणावं चाचाला सुधरेना. त्यावेळी त्याने स्वत:च पूर्ण घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील भारतीयांनी चाचाचा पाणउतारा काढला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा Video 



दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी बॉलीवूडचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दुपारी होणार आहे. या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन, अरजित सिंग आणि सुखविंदर सिंग हे आपली कला सादर करतील.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.


पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.