IND vs PAK : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 world cup) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याने मोहिमेला सुरुवात करणार आहे. मेलबर्नच्या (melbourne) मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होणार आहे. मात्र मेलबर्नच्या मैदावर पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी अनेक भाकितं वर्तवण्यात येत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी पाकिस्तानी संघाला  उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे. (IND vs PAK Pakistan Cricket Board chief Ramiz Raja advice to Babar Azam for T20 world cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध सामना खेळण्याची पाकिस्तानची ही 13 वी वेळ असेल. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दुबईत पाकिस्तानने भारताविरुद्ध एकमेव विजय मिळवला होता. 


ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानची मोहीम सुरू होण्यापूर्वी, रमीझ राजा यांनी जिओ टीव्हीशी बोलताना बाबरला काय सांगितले ते उघड केले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पलीकडे दुसरा-तिसरा कोणताही विचार करू नकोस, ट्रॉफी घरी घेऊन ये असा सल्ला रमीझ राजा यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दिला आहे. 


'मी कर्णधार बाबर आझमला फक्त टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहण्यास सांगितले आहे. मी बाबर आझमला सांगितले की टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय मनात ठेवू नको. जिंकण्याशिवाय या स्पर्धेत दुसरा पर्याय नाही,' असे रमीझ राजा म्हणाले. 


रमीझ यांनी बाबरसोबत ऑस्ट्रेलियन परिस्थितीचा सामना कसा करावा यासाठी काही टिप्सही शेअर केल्या. 1992 मध्ये, पाकिस्तानने ऑस्ट्रेलियन भूमीवर विश्वचषक जिंकला होता आणि रमीझ त्या संघाचे भाग होते. 'पाकिस्तानमध्ये खेळाडूंना शॉट्स खेळण्यासाठी वेळ मिळतो, पण ऑस्ट्रेलियात तसे नाही,' असे राजा म्हणाले.