पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) टीम इंडिया (Team India) उद्या 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) भिडणार आहे. दोन्ही संघातला हा सामना काँटे की टक्कर असणार आहे. मात्र या सामन्यापुर्वी जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियात दोन्ही संघाचे रेकॉर्ड कसे आहेत ते. कारण हा रेकॉर्डच उद्याच्या सामन्यात कोण विजयी ठरणार आहे, हे सांगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : टीम इंडियाच्या विजयात 'हे' 4 खेळाडू ठरतात अडथळा, जाणून घ्या  


 पाकिस्तानचा रेकॉर्ड काय? 


सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानचा (Pakistan) ऑस्ट्रेलियात (Australia) रेकॉर्ड काय आहे तो पाहूयात. आजपर्यंत पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियात एकही टी20 सामना जिंकलेला नाही. पाकिस्तान (Pakistan) संघाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 सामने हरले आहेत, तर एक सामना ड्रॉ राहिला आहे. विशेष म्हणजे हे चारही सामने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळला होता. 


हे ही वाचा : रोहित शर्माचं पाकिस्तानलाच थेट आव्हान!


2010 मध्ये पाकिस्तान (Pakistan) संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात (Australia) सामना खेळला होता. या सामन्यात भेदक गोलंदाजीने पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 127 धावांवर रोखले होते. पण तरीही पाकिस्तानला विजय मिळवता आला नव्हता. या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाला केवळ 125 धावा करता आल्या. त्यानंतर 2019 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात तीन टी-20 सामने खेळले. पहिला सामना ड्रॉ राहिला. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना एकतर्फी 7 विकेट राखून जिंकला आणि तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला केवळ 106 धावांवर रोखून 12 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले.


भारताचा रेकॉर्ड काय सांगतो?


भारतीय संघ आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियात (Australia) 12 टी-20 सामने खेळला आहे. येथे भारताने 7 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. एक सामना ड्रॉ राहिला आहे. 2012 आणि 2018 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्याचवेळी, 2016 आणि 2020 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते. 


हे ही वाचा : मौका-मौका!2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार,रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास


रेकॉर्डमध्ये कोण वरचढ 


भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) ऑस्ट्रेलियातला (Australia) रेकॉर्ड पाहिल्यास, टीम इंडिया (Team India) वरचढ ठरताना दिसतेय. कारण टीम इंडियाने 7 सामन्यातून 4 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 4 मधून तीन सामन्यात हार पत्करली आहे. त्यामुळे दोघांची आकडेवारी पाहता टीम इंडिया वरचढ ठरतेय. 


दरम्यान हा रेकॉर्ड पाहता टीम इंडियासाठी (Team India) दिलासादायक बाब आहे. तर पाकिस्तानचा हा रेकॉर्ड त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पाकिस्तानचा (Pakistan) हाच खराब रेकॉर्ड टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो.