दुबई : टी -20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महामुकाबल्याची वाट पाहत आहेत. तर क्रिकेटच्या मैदानावर दोन देशांमधील संघर्षाशी संबंधित विशेष जाहिरात देखील आली आहे. खास 'मौका मौका' या जाहिरातीचं नवं वर्जन समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानला आजपर्यंत कोणत्याही वर्ल्डकपमध्ये भारताला हरवता आलेलं नाही. जेव्हा जेव्हा पाकिस्तानला भारताकडून पराभव मिळतो, तेव्हा तिथे टीव्ही फुटतात. हीच गोष्ट 'मौका-मौका' जाहिरातीच्या नवीन वर्जनमधून दाखवण्यात आली आहे.


जाहिरातीमध्ये हाच जुना पाकिस्तानी क्रिकेट चाहता दिसतो आहे. यावेळी, हा व्यक्ती रॉकेट आणि फटाक्यांच्या इतर वस्तूंसह एक टीव्ही खरेदी करण्यासाठी दुबईच्या मॉलमध्ये पोहोचतात. जाहिरातीत तो सांगतो की, मोठा टीव्ही दाखवा कारण यावेळी बाबर आणि रिझवान दुबईहून असे षटकार मारतील की दिल्लीतील लोकांच्या घरांच्या काचा फुटतील. 



पाकिस्तानी चाहत्याकडून हे ऐकून, टीव्ही शोरूम त्याला एकाऐवजी दोन टीव्ही देतो आणि म्हणतो की टी -20 वर्ल्डकपमध्ये तुम्ही 5 वेळा सामने गमावले आहे. म्हणून 2 टीव्ही घ्या. 'बाय वन-गेट वन फ्री'. म्हणजेच सामन्यानंतर एकामागोमाग एक टीव्ही फोडणं सोपं होईल. स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही जाहिरात शेअर केली आहे, जी फॅन्सना खूप आवडली आहे.


विश्वचषक सामन्यांमध्ये भारत 12-0 ने आघाडीवर


भारत आणि पाकिस्तान यांच्यात 50 ओव्हर्स आणि 20 ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. 50 ओव्हर्सच्या सामन्यांमध्ये भारत 7-0 ने आघाडीवर आहे, तर टी -20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची 5-0 आघाडी कायम आहे.