लखनऊ : दक्षिण आफ्रिकेने (south africa) पहिल्या वनडे सामन्यात 4 विकेट गमावून 249 धावा ठोकल्या आहेत. यामुळे टीम इंडियासमोर (Team India) 250 धावांचे असणार आहे. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गील (Shubman gill) एकेरी धावसंख्या करून आऊट झाला. दरम्यान शुभमन गील आऊट होताच त्याला आता ट्रोल केले जातेय. गर्लफ्रेंडच्या नावाने तो ट्रोल होतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दक्षिण आफ्रिकेने (south africa) दिलेल्या 250 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला टीम इंडियाकडून (Team India) शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubman gill) सलामीला उतरले होते. मात्र टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. शुभमन गिलच्या रूपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो 7 बॉलमध्ये 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर शिखर धवन देखील 16 बॉलमध्ये 4 धावा करून बाद झाला होता.


शुभमन गिल ट्रोल
शुभमन गिल (Shubman gill) आऊट होताच सोशल मीडियावर ट्रोल झाला.अनेक य़ुझर्सनी त्याला लवकर आऊट झाल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल केले. एका युझरने ''दिल है कि मानता नही'', या गाण्याचा संदर्भ घेत ''गिल है कि मानला नही'' असे ट्विट करत शुभमनला ट्रोल केले होते.



फॅनने घेतले गर्लफ्रेंडचं नाव 
शुभमन गिलची (Shubman gill) सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरु असताना एका य़ुझरने त्याची गर्लफ्रेंडच काढली. या य़ुझरने त्याच्या गर्लफ्रेंडच नाव लिहत त्याला ट्रोल केलं. युझरने ''सारा' देश दुखी, शुभमन गिल आऊट' अशा आशयाचे ट्विट करत त्याला ट्रोल केले. त्यामुळे या प्रकरणात उगाच शुभमन गिलच्या गर्लफ्रेंडला ओढल्याची चर्चा आहे.  



सारा विरूद्ध सारा! कोण आहे 'ती'?
दरम्यान सारा नावाच्या दोन प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. एकीला सिनेमाची पार्श्वभूमी आहे, तर दुसरीला क्रिकेटची पार्श्वभूमी आहे. खरं तर शुभमन गिलचं नाव या दोघींसोबत जोडलं जात, या दोघी म्हणजे सारा तेंडूलकर आणि सारा अली खान. मात्र त्याची खरी सारा ही सारा अली खान (Sara Ali Khan) आहे.  


लंडनमध्ये झाले होते स्पॉट?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिल (Shubman gill) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) लंडनच्या एका हॉटेलमध्ये स्पॉट झाले होते. या संदर्भातला फोटोही समोर आला होता.या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघे एका रेस्टॉरंटमध्ये दिसले, जिथे ते एकत्र डिनर करताना स्पॉट झाले होते. हा फोटो दुबईचा सांगितला जात आहे, पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्हायरल होत असलेला फोटो लंडनचा असल्याचं सांगितलं जात आहे. 



दरम्यान या फोटोनंतर शुभमन गिलंच (Shubman gill) नेमकं कोणत्या सारा सोबत अफेअर होत, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्याची नावे अनेकदा जोडली जातात आणि अफेअरची चर्चा सुरु होते.