IND vs SA, 1st T20 : इशान किशनची वादळी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचं आव्हान
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa 1st T20i) विजयासाठी 212 धावांचं आव्हान मजबूत आव्हान दिलं आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa 1st T20i) विजयासाठी 212 धावांचं आव्हान मजबूत आव्हान दिलं आहे. इशान किशनच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 211 धावा केल्या. विशेष म्हणजे दिल्लीतील अरुण जेटली मैदानावरील टीम इंडियाचा टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. (ind vs sa 1st t20i team india set 212 runs for winning south africa ishan kishan shine)
इशानने टीम इंडियाकडून सर्वाधिक 76 धावांची वादळी खेळी केली. श्रेयस अय्यरने 36 रन्स झोडल्या. हार्दिक पंड्याने नाबाद 31 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन ऋषभ पंतने 29 धावा करुन माघारी परतला. तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने 23 रन्स केल्या. तर 3 वर्षांनी टीम इंडियात परतलेला दिनेश कार्तिकला विशेष काही करण्याची संधी मिळाली नाही. दिनेशने नाबाद 1 धावेचं योगदान दिलं.
आफ्रिकेकडून केशव महाराज, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल आणि ड्वेन प्रिटोरियसने या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
टेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेज शम्सी, कैगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्टजे.
टीम इंडिया की प्लेइंग इलेव्हन :
ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर) ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान.