Shikhar Dhawan: कर्णधार धवनचे विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ खेळाडूमुळेच...
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू श्रेयसनं शतक तर ईशाननं 93 धावा ठोकत भारताचा विजय मिळवून दिला आहे. याचदरम्यान कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले असून त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुकही केले.
Shikhar Dhawan On Team India : टीम इंडियाने रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसरा (ind vs sa 2nd od) सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या (team india) अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे गरजेचे होते आणि संघाने ते करून दाखवले. भारतीय कर्णधार शिखर धवनने (shikhar dhawan) आफ्रिकेविरुद्धच्या सात विकेट्सने विजयासाठी संघाच्या अष्टपैलू कामगिरीचे श्रेय दिले आणि अनेक खेळाडूंचे कौतुक केले. (ind vs sa 2nd odi highlights shikhar dhawan on ishan kishan shreyas iyer)
हे खेळाडू टीम इंडियाच्या विजयाचे हिरो होते
दक्षिण आफ्रिकेच्या 279 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नाबाद 113 धावा आणि इशान किशनच्या (Ishan Kishan) 93 धावांच्या जोरावर तिसर्या विकेटसाठी केलेल्या 161 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 1- बरोबरीत जिंकली. तत्पूर्वी गोलंदाजीत मोहम्मद सिराज (३८ धावांत ३ बळी), शाहबाज अहमद (५४ धावांत एक विकेट), कुलदीप यादव (४९ धावांत एक विकेट) यांनी छाप पाडली.
कर्णधार धवनने दिले मोठे वक्तव्य
सामना संपल्यानंतर शिखर धवन (shikhar dhawamn) म्हणाला, चेंडूची चांगली फलंदाजी सुरू होती. त्यामुळे पहिल्या दहा षटकांमध्ये गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पध्दतीचा अवलंब करण्याची आमची योजना होती. पण मैदानात दव पडू लागल्यामुळे चेंडू हातातून घसरत होता. त्यामुळे खेळणे जास्तच सोपे झाले. मी गोलंदाजांवर, विशेषतः शाहबाजवर खूप खूश आहे. पहिल्या दहा षटकांमध्ये त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आम्हाला यश मिळवून दिले.
नाणेफेक हरल्यानंतर असे सांगितले
विरोधी संघाचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचा आनंद असल्याचे भारतीय कर्णधार शिखर धवनने सांगितले. तो म्हणाला, 'नाणेफेक चांगला झाला, मी आनंदी आहे. केशवचे आभार मानले की त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मला म्हणायचे आहे की ईशान आणि श्रेयसने ज्या प्रकारे भागीदारी केली ते पाहण्यासारखे होते.
आफ्रिकन कर्णधाराने पराभवाचे कारण सांगितले
दवमुळे एवढा फरक पडेल, अशी अपेक्षा नव्हती, असे केशव महाराज म्हणाले. "दव इतकी मोठी भूमिका बजावेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती म्हणून आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण श्रेयस आणि संजूला जाते," तो म्हणाला. ही खेळपट्टी संथ आणि कमी असेल अशी आम्हाला अपेक्षा होती पण 20 षटकांनंतर खेळपट्टी चांगली झाली.
वाचा : Aadhar Card Update : आधारकार्डाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी...
श्रेयस अय्यरला सामनावीर घोषित करण्यात आले
श्रेयस अय्यरला त्याच्या नाबाद शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तो म्हणाला, 'खरं सांगायचं तर मी आनंदी आहे. जेव्हा मी फलंदाजीला गेलो तेव्हा मी ईशानशी बोललो आणि तो गोलंदाजांविरुद्ध आक्रमक दृष्टिकोन बाळगण्याच्या मानसिकतेने खेळत होता. त्यामुळे आम्ही गुणवत्तेवर चेंडू खेळण्याचा निर्णय घेतला.