मुंबई : आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 9 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी 'करो या मरो' बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत मालिकेत कमबॅक करण्यासाठी त्याच्या गोलंदाजांना कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.


शाहबाज अहमद करू शकतो डेब्यू


दीपक चहर पाठीच्या समस्येमुळे उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडल्याने भारताला आधीच मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला आहे. मोहम्मद सिराज आणि आवेश खान आतापर्यंत छाप पाडण्यात अपयशी ठरलेत. रवी बिश्नोईही पहिल्या सामन्यात चांगलाच महागात पडला, त्यामुळे फिरकी अष्टपैलू शाहबाज अहमदला पदार्पणाची संधी मिळू शकते. 


शिखर धवनकडून कर्णधारपदाच्या खेळीची अपेक्षा


शिखर धवनने यापूर्वीच वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेत कर्णधार म्हणून आपली नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. दुसऱ्या वनडेत उत्तम खेळी करत टीमला दमदार सुरुवात करून देण्याचं धवनचं लक्ष्य असेल. तर शुभमन गिललाही सलामीवीर म्हणून आपली कामगिरी सुधारायची आहे. 


दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया


शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अवेश खान, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, रजत पाटीदार , शाहबाज अहमद आणि राहुल त्रिपाठी.