पार्ल | दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांची मालिकाही जिंकली आहे. आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान आफ्रिकेने 3 विकेट्स गमावून 11 चेंडूंआधीच पूर्ण केलं. (ind vs sa 2nd odi south africa beat india by 7 wickets and win series at  boland park paarl) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेकडून जनेमन मालनने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने 78 रन्स केल्या.  रॅसी व्हॅन डर ड्युसेन आणि एडन मार्कराम या जोडीने आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचावलं. या दोघांनी नाबाद प्रत्येकी 37 धावांची खेळी केली. तर कर्णधार टेम्बा बावुमाने 35 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूर, यूजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली. 


दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन केएल आणि रिषभ पंत या दोघांनी केलेल्या केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 287 धावांपर्यंत मजल मारता आली. 


रिषभ पंतने 71 चेंडूत  10 फोर आणि 2 सिक्ससह 85 धावांची खेळी केली. तर केएलने  55 रन्स केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने शेवटच्या काही ओव्हरमध्ये नाबाद 40 धावांची निर्णायक खेळी केली. तर रवीचंद्रन अश्विनने नाबाद 25 धावा करत शार्दुलला चांगली साथ दिली.


तिसरा सामना केव्हा? 


दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 23 जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.  


साऊथ आफ्रिका | क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जनेमन मालन, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लुंगी एनगिडी, सिसांडा मगला आणि तबरेझ शम्सी. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.