IND vs SA 2nd T20I : दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडिया playing 11
टीम इंडिया (indian Cricket Team) 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
गुवाहाटी : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20I) यांच्यातील दुसरा टी 20 सामना रविवारी 2 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी गुवाहाटीतील बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये (Barsapara Cricket Stadium) सुरुवात होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या हा सामना जिंकून मालिका विजयाची पंरपरा कायम ठेवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यामुळे या निर्णायक सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. (ind vs sa 2nd t20i team india captain rohit sharma may changes in playing 11 against south africa at barsapara cricket stadium guwahati)
रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोघे ओपनिंग करु शकतात. केएलने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात नाबाद 51 रन्स केल्या होत्या. मात्र रोहित शून्यावर आऊट झाला होता. त्यामुळे या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.
विराट कोहलीकडे तिसऱ्या नंबरची जबाबदारी असणार आहे. विराटला गेल्या काही सामान्यांपासून सूर गवसला आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे विराटला या सीरिजमध्ये वर्ल्ड कपसाठीचा सराव करण्याची उत्तम संधी आहे.
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टीम इंडियाकडून 2022 या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्याने आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 50 धावा केल्या होत्या. सूर्या जोरदार फॉर्मात आहे. तर हार्दिक पंड्या 5 व्या क्रमांकावर खेळायला येऊ शकतो.
विकेटकीपर कोण?
दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) विकेटकीपर म्हणून संधी मिळू शकते. कार्तिकने टीम इंडियासाठी फिनीशर म्हणून निर्णायक भूमिका बजावली आहे. डीकेने इंग्लंड आणि विंडिज विरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे कॅप्टन रोहित कार्तिकला संधी देऊ शकतो.
जसप्रीत बुमराहच्या जागी कोण?
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. दीपक चहर (Deepak Chahar)आणि अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh)संधी मिळू शकते.
स्पिनर्स कोण?
भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत अक्षर पटेल (Axar Patel) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या खेळपट्ट्यांवर कहर करण्यासाठी हजर आहेत. अक्षर पटेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत असून तो किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हर्षल पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
दुसऱ्या टी 20 साठी संभावित टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, अक्षर पटेल और रविचंद्रन अश्विन.