जोहान्सबर्ग : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले आहे. विराटसेनेने दुसऱ्या डावात ऑलआऊट 266 धावा केल्या. टीम इंडियाककडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. (ind vs sa 2nd test 2nd day india set target 240 runs for south aftica at johannesburg)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेकडे 27 धावांची आघाडी होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 266 धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेला 240 धावांचे आव्हान मिळाले. अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच दोघांनी अर्धशतकं लगावली.


रहाणेने 58 तर पुजाराने 53 धावांची खेळी केली. हनुमा विहारीने नाबाद 40 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 28 आणि मयांक अगरवनालने 23 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही विशेष असं योगदान देता आलं नाही. तर आफ्रिकेकडून कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि मार्को जेन्सन या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.  


साऊथ आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :  डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पिटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल व्हेरेने (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.