विशाखापट्टनम : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा (IND vs SA 3rd T20I) आणि निर्णायक सामना आज (14 जून) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजत विशाखापट्टनम इथे सुरुवात होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा निर्णायक असा सामना आहे. आफ्रिका या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आफ्रिकेला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. (ind vs sa 3rd t20i team india may 3 changes in playing 11 against south africa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. टीम इंडियाने याआधीच्या 3 टी 20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघांना व्हॉईटवॉश दिला होता. मात्र आता या मालिकेत टीम इंडियाला सलग पहिल्या 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता टीम इंडिया समोर  मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याची परिस्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे.


प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता


निर्णायक सामना असल्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि युजवेंद्र चहल या तिघांना डच्चू मिळू शकतो.


कोणाला संधी? 


ऋतुराज, आवेश आणि चहल हे तिघेही पहिल्या 2 सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरले. या तिघांना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या तिघांना डच्चू देऊ शकते. या तिघांच्या जागी अनुक्रमे वेंकटेश अय्यर, उमरान मलिक आणि रवी बिश्नोई या तिघांना संधी दिली जाऊ शकते.


आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 साठी संभावित टीम इंडिया : 


वेंकटेश अय्यर, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार.