राजकोट : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 4th T20i) शानदार अर्धशतकी खेळी केली. कार्तिकने सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकच्या टी 20 कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. (ind vs sa 4th 20i team india batter dinesh karthik sensetional maiden fifty against south africa at rajkot) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकने अवघ्या 26 चेंडूंच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकला अर्धशतकासाठी 1 धावेची गरज असताना त्याने खणखणीत 85 मीटर लांब सिक्स लगावला. कार्तिकने अर्धशतकी खेळीत 9 चौकार आणि 2 गगनचुंबी सिक्स ठोकले. मात्र अर्धशतकी खेळीनंतर कार्तिक आऊट झाला. कार्तिकने एकूण 55 धावांची खेळी केली. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : 


ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अवेश खान. 


दक्षिण अफ्रीका प्लेइंग इलेव्हन :


टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रस्सी वॅन डेर डूसन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जानसेन, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी आणि एनरिक नॉर्टजे.