Rishabh Pant Birthday : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरा T20I सामना आज इंदुरच्या मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात आत 3 मोठे बदल करण्यात आले होते. केएल राहुल, विराट कोहली आणि अर्शदीप सिंहच्या जागी श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावाच्या तिसऱ्या षटकात इंदूरचे चाहते हॅपी बर्थडे गाताना दिसले. जे ते भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) गात होता.


भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी 25 वर्षांचा झाला आहे. या मॅचमध्ये चाहत्यांनी ऋषभच्या वाढदिवसानिमित्त स्टँडवर बसून त्याच्यासाठी ‘हॅप्पी बर्थडे टू यू’ गायले.



दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या तिसऱ्या षटकात दीपक चहर जेव्हा टेम्बा बावुमाला गोलंदाजी देत ​​होता. तेव्हा स्टँडमधील चाहत्यांनी ऋषभ पंतसाठी "हप्पी बर्थडे सॉन्ग" गायले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


भारताचा तिसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. बॉलर्सनंतर बॅट्समनने देखील फ्लॉप शो दाखवला.