IND vs SA Final वर पावसाचं सावट, `रिझर्व डे`ला पाऊस आला तर वर्ल्ड कप ट्रॉफी कुणाची?
India vs South Africa T20 World Cup Final : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवली जाईल. परंतू राखीव दिवशी देखील (Barbados Weather Forecast) पाऊस झाला तर ट्रॉफी कोण उचलणार?
IND vs SA Final Barbados Weather Forecast : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) या दोन संघात खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. अशातच आता सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसाने अंतिम सामन्यात (Barbados Weather Forecast) खोडा घातला तर वर्ल्ड कपची ट्रॉफी कोणाची असेल? चला जाणून घेऊया आयसीसीचा नियम...
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट
अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (Team India vs South Africa Final) होणार असून 29 जूनला बारबाडोसमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, बारबाडोसमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी म्हणजेच 29 जूनला पाऊस आणि वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या सुरूवातीला म्हणजे सामन्याच्याआधी 99 टक्के ढग असतील तर वादळाची शक्यता देखील 47 टक्के आहे. त्यामुळे आता सामना व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली जातीये.
सामना झालाच नाही तर?
जर पावसामुळे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात फायनलचा सामना 29 जून रोजी खेळवला जाऊ शकला नाही तर आयसीसीने रिझर्व्ह डे ठेवला आहे. सामना 29 जून रोजी झाला नाही तर सामना 30 जून रोजी खेळवला जाईल. वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यासाठी आयसीसी पूर्ण प्रयत्न करणार आहे. परंतू जर सर्व प्रयत्न करून देखील सामना झाला नाही तर भारत आणि साऊथ अफ्रिका या दोन्ही संघांना टी-20 विश्वचषक 2024 चे संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.