T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी  जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20  मालिकेसह टी20 विश्वचषक स्पर्धेमधून (T20 World Cup 2022) बाहेर पडल्याचे जाहीर केले. यामुळे टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बुमराच्या जागी बीसीसीआयने (BCCI) एका घातक गोलंदाजाला संधी दिली आहे. हा खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी बीसीसीआयने (BCCI) मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संधी दिली आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "निवडकर्त्यांनी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात समावेश केला आहे. बुमराहला पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे." या मालिकेतील उर्वरित दोन सामने 2 ऑक्टोबरला गुवाहाटी आणि 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणार आहेत. (mohammed siraj replace injured jasprit bumrah)


मोहम्मद सिराज हा किलर बॉलिंगमध्ये निष्णात खेळाडू आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.  28 वर्षीय मोहम्मद सिराजने फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची चार षटके कायमच महत्त्वाची ठरतात.



दरम्यान, मोहम्मद सिराज भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. सिराजने भारतासाठी 13 कसोटी सामन्यात 40 बळी, 10 एकदिवसीय सामन्यात 10 बळी आणि 5 टी-20 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला होता.