दिल्ली : टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आधीच 2-0 असा पराभव पत्करलेल्या टीम इंडियाला आता शेवटचा सामना जिंकून घरी जायला आवडेल. मालिकेतील शेवटच्या सामन्यात कर्णधार केएल राहुल काही बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये युवा खेळाडूला खेळण्याची संधी मिळेल. पाहूया काय असेल टीम इंडियाचं संभाव्य प्लेइंग 11


अशी असेल टॉप ऑर्डर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेतील पहिल्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करणारा शिखर धवन या सामन्यातही कर्णधार केएल राहुलसोबत ओपनिंगला येण्याची शक्यता आहे. यानंतर माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यात विराट 51 रन्स केले होते. तर दुसऱ्या वनडेत त्याला खातंही उघडता आलं नाही. या सामन्यात त्याच्याकडून पुन्हा 71व्या शतकाची अपेक्षा आहे.


मिडल ऑर्डरमध्ये होणार बदल


सिरिज गमावल्यानंतर आज भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये मोठे बदल होऊ शकतात. चौथ्या क्रमांकावर असलेल्या या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अय्यरला साजेशी कामगिरी करता आली नाही. शिवाय दुसऱ्या सामन्यातही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. 


यानंतर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर येईल. पंतने गेल्या सामन्यात 85 रन्सची उत्तम खेळी खेळली होती. 6व्या क्रमांकावर असलेल्या व्यंकटेश अय्यरकडून पुन्हा एकदा खूप अपेक्षा असतील. 


भुवनेश्वर कुमारला मिळणार बाहेरचा रस्ता


शार्दुल ठाकूर 7व्या क्रमांकावर उतरेल. पहिल्या सामन्यातही ठाकूरने अर्धशतक झळकावलं होतं. मात्र गोलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला. दुसरीकडे युजवेंद्र चहलचा समावेश करण्यात येईल. या सामन्यात आर अश्विनच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता मिळणार असून त्याची जागा मोहम्मद सिराज घेईल.


संभाव्य प्लेइंग 11


केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर,  शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल,  मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).