IND vs SA, 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात वाद झालेला पाहायला मिळाला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) मैदानावर अंपायरशी भिडला. मोहम्मद सिराजच्या या कृत्यामुळे त्याला मॅच फीचा दंडही बसू शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या सामन्यात अंपायर वीरेंद्र शर्मा (Virendra Sharma) यांच्यावर खूप नाराज झाला. (mohammed siraj argument with umpire)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वातावरण चांगलेच तापले. मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेच्या इनिंग दरम्यान 48 व्या ओव्हरमध्ये अंपायर सोबत भिडला. मोहम्मद सिराजच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराज बीट झाला आणि बॉल यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला.


सिराजचा थ्रो चुकला


यानंतर संजू सॅमसनने बॉल मोहम्मद सिराजकडे परत केला, त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंडला क्रीजच्या बाहेर आलेल्या डेव्हिड मिलरला धावबाद करण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराजने जोरदार थ्रो मारला. मोहम्मद सिराजचा स्टंप चुकला आणि बॉल बाँड्री पार गेला.



मोहम्मद सिराजला राग अनावर


त्यानंतर मैदानावरील अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेला चौकार दिला. त्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चांगलाच संतापला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.