केएलची दुखापत या खेळाडूच्या पथ्यावर, कोणाला मिळाली नेतृत्वाची जबाबदारी?
कॅप्टन्सीची जबाबदारी असलेला केएल राहुल (K L Rahul) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.
मुंबई : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20I Series2022) यांच्यातील टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आली आहे. आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला मोठा झटका बसला. (ind vs sa t 20i series risabh pant will lead Indian side after k l rahul ruled out of series due to injurey)
कॅप्टन्सीची जबाबदारी असलेला केएल राहुल (K L Rahul) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता केएलच्या जागी नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. केएलच्या अनुपस्थितीत आता टीम इंडियाचा रिषभ पंत (Rishbh Pant) टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलला कॅप्टन्सी देण्यात आली. मात्र या मालिकेच्या सुरुवातीआधी केएल च्या उजव्या मांडीला दुखापत झाली. यामुळे केएलला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पंतला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु
टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.
टीम इंडिया
ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, वाय चहल, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.