मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी फार महत्वाची आहे. कारण या सामन्यात सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याच सामन्यातील परफॉर्मन्सच्या बळावर टी-20 विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे या मालिकेला फार महत्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-20 सामन्यात अनेक युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली. टीम इंडियाच्या अनेक बॉलर्सची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धुलाई केली.  त्यामुळे या खेळाडूंना आणखीण एक सामन्याची संधी दिली जाईल, अन्य़था त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. हे नेमके खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात. 


अक्षर पटेल
टी-20 मालिकेत अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे. मात्र पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत खराब होती. त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. अक्षर पटेल आपल्या जुन्या लयीत दिसत नाही, अशा स्थितीत त्याला येत्या सामन्यांमध्ये संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्यामुळे अक्षर पटेलला जर टीममध्ये जागा मिळवायची आहे, तर लवकरचं त्याला फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे.


हर्षल पटेल
सीनियर खेळाडूंच्या जागी आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात हर्षल पटेलने अत्यंत खराब गोलंदाजी केली.त्याने 43 धावा केल्या आणि फक्त एक विकेट घेतली. टीम इंडियात त्याला जागा टिकवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल.


आवेश खान
आवेश खानची टीम इंडियातील कामगिरी आतापर्यंत फ्लॉप ठरली आहे. पहिल्या T20 मध्येही आवेशने 35 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आवेश खानची कामगिरी अशीच सुरू राहिली तर त्याला संघातून वगळण्याची शक्यता आहे. 


दरम्यान या तीन युवा खेळाडूंना दुसऱ्या टी 20  सामन्यात आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मंन्स देण गरजेचं आहे. जर असा परफॉर्मंन्स देण्यात ते अयशस्वी ठरले तर संघातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.