IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय
Ind vs Sa T20 Series : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आफ्रिकेला अस्मान दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 सीरिजला (IND vs SA T20I) 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आफ्रिकेला अस्मान दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 28 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) या आधी मोठी खेळी केली आहे. रोहितने पहिल्या सामन्याआधी घातक गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. (ind vs sa t20 series team india captain rohit sharma deepak chahar against south africa)
या खेळाडूची एन्ट्री
रोहितने या सीरिजमध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोटात भीतीचं वातावरण आहे. हा खेळाडू एकहाती सामना पालटू शकतो. संघात दीपक चाहरची एन्ट्री झाली आहे.
दीपकमध्ये निर्णायक क्षणी विकेट्स घेण्याची क्षमता आहे. तसेत तो बॅटिंगही करु शकतो. दीपकच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आहे. त्यामुळे दीपकचा टीम इंडियाला दोन्ही आघाड्यांवर फायदा होऊ शकतो.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वेळापत्रक
पहिली टी20 मॅच - 28 सप्टेंबर
दूसरी टी20 मॅच - 2 ऑक्टूबर
तिसरी टी20 - 4 अक्टूबर
वनडे सीरिज
पहिली वनडे- 6 ऑक्टोबर
दूसरी वनडे - 9 ऑक्टोबर
तिसरी वनडे- 11 ऑक्टूबर
साउथ अफ्रीका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि श्रेयस अय्यर.