पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 World Cup) आज टीम इंडियाचा (team india) तिसरा टी20 सामना दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता पर्थच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्रह्मास्त्र वापरणार आहे. हा ब्रम्हास्त्र टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमधील तिसऱ्या विजयाचा मार्ग आणखीण मोकळा करणार आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण असणार आहे, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित (Rohit sharma) सेनेतला एक खेळाडू दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) खुप भारी पडू शकतो. हा क्रिकेटपटू जर मैदानात उतरला तर दक्षिण आफ्रिकेचा काही खर नाही. कारण हा खेळाडू आपल्या किलर बॉलिंगमध्ये तरबेज आहे. त्याचे बॉल खेळणे कुणालाही सोपे नाही. हा क्रिकेटर दुसरा कोणी नसून लेगस्पिनर युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) आहे. रोहित शर्मा आजच्या सामन्यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जागी लेगस्पिनर युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो.


ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर रेकॉर्ड काय?


युझवेंद्र चहलचा (yuzvendra chahal) ऑस्ट्रेलियात खूप चांगला रेकॉर्ड आहे. चहल हा भारताचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 85 बळी घेण्याचा विक्रम चहलच्या नावावर आहे. युझवेंद्र चहलकडे बॉलिंगच्या जोरावर भारतासाठी एकट्याने सामने जिंकण्याची क्षमता आहे. युजवेंद्र चहल हा रविचंद्रन अश्विनपेक्षा चांगला टी-20 गोलंदाज आहे. युझवेंद्र चहलने आतापर्यंत भारताकडून 69 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 85 बळी घेतले आहेत.


युझवेंद्र चहलचा (yuzvendra chahal) हा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड पाहुनच रोहित शर्मा त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्याला संघी मिळते का हे सामन्याच्या टॉसवेळीच कळणार आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जर सामना जिंकला तर टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपच्या (t20 World Cup) सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये स्थान गाठण्याचं लक्ष्य असणार आहे. 


टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.