पर्थ : IND VS SA T20 World Cup ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार आहे. या सामन्यापुर्वी वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूने टीम इंडियाला मोठा इशारा दिला आहे. हा इशारा टीम इंडियासाठी आतापर्यंत धोक्याची घंटा ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : अशी असेल टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग XI, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि Match Prediction  


येत्या 30 ऑक्टोंबरला म्हणजेच रविवारी टीम इंडियाचा (Team India) तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापुर्वी वर्ल्ड कप विजेते कर्णधार आणि माजी भारतीय खेळाडू कपिल देव यांनी एक मोठे विधान केले आहे.हे विधान करून त्यांनी टीम इंडियाला मोठा इशारा दिला आहे. त्याच्या मते संघात काही त्रुटी आहेत, या त्रुटी सोडवणे फार गरजेचे आहे.  


गोलंदाजीत कमी आहोत...


कपिल देव (Kapil Dev) म्हणाले की, गोलंदाजीत सुधारणा झाली पाहिजे. मैदाने मोठी आहेत, त्यामुळे फिरकीपटू थोडे फायदेशीर स्थितीत आहेत. मात्र तरीही आम्ही गोलंदाजीत अजूनही थोडे कमी आहोत. नेदरलँड्स विरूद्धचा सामन्याला हवाला देताना कपिल देव म्हणाले की, फलंदाजीत मला वाटते की धावसंख्या उभारता आली असती, पण शेवटच्या 10 षटकांत 100 पेक्षा जास्त धावा करून त्याची भरपाई केली. 


नेदरलँड्स सारख्या संघाविरुद्ध लाईन आणि लेन्थच्या बाबतीत कुठे गोलंदाजी करायची याची योग्य योजना तुमच्याकडे असायला हवी. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशा सामन्यांमध्ये कोणतेही चेंडू किंवा वाइड नसावेत, त्यामुळे एकंदरीत, मी म्हणेन की गोलंदाजी चांगली होती, परंतु तरीही काही त्रुटी होत्या, असे कपिल देव (Kapil Dev) यांनी सांगितले.  


रोहित शर्माबद्दल काय म्हणाले?


कपिल देव (Kapil Dev) रोहित शर्माबद्दल (Rohit sharma) म्हणाले की, भारताला अजूनही त्यांचा कर्णधार रोहित शर्मा थोडा अधिक कॉम्पॅक्ट असावा असे वाटते. राहुलने काही धावा केल्या पाहिजेत. विराट कोहलीने (Virat Kohli) अँकरची भूमिका बजावली पाहिजे, कारण तो नंतर डावाचा वेग वाढवू शकतो, परंतु त्याला पूर्ण 20 षटके खेळण्याची संधी मिळाल्यास हा संघ कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, अशीही बाजू त्यांनी मांडली. 


तसेच कपिल देव (Kapil Dev) यांनी पुढे सूर्यकुमार यादवचे देखील कौतूक केले. सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना सांगितले की, त्यांनी या संघातील संधींचा खरोखर फायदा केला आहे. इतक्या लवकर धावा केल्याबद्दल, तो अधिक कौतुकास पात्र आहे, असे स्तुतिसुमने उधळली. 


दरम्यान कर्णधार रोहीत शर्माने (Rohit sharma) जर कपिल देव (Kapil Dev) यांनी सांगितलेल्या त्रुटी सोडवल्या तर निश्चितच वर्ल्ड कप वर टीम इंडिया नाव कोरेल, असा विश्वास फॅन्स उपस्थित करतायत.